पंढरपूर पोटनिवडणूक भाजपचे समाधान आवताडे ३७३३मतानी विजयी
मतदारांनी इतर उमेदवारांना नाकारले व सरळ लढतीत शेवटच्या फेरी पर्यंत लढत ठेवली

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक १७मे रोजी झाली होती. त्याचा निकाल आज २मे रोजी होता मतमोजणीच्या अखेरच्या फेरी नंतर पोस्टल मते मिसळून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना१,०९४५० यांना मते मिळाली तर महाविकास आघाडी चे उमेदवार भगिरथ भालके यांना१,०५७१७ मते मिळाली. समाधन आवताडे यांनी ३७३३मतानी भगिरथ भालके यांचेवर विजय मिळविला आहे.
मतदार संघातील मतदारांनी अपक्ष व इतर पक्षांच्या उमेदवारांना नाकारले असुन सरळ लढतीत दोन्ही उमेदवारांना लाखाच्या पुढे मतदान केले.असुन अत्यंत चुरस निर्माण करुन मोठ्या फरकाने मिळणारा विजय कमी फरकावर आणला आहे.
आ.प्रशांतराव परिचारक यांचे नेटके नियोजन, समाधान आवताडे यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा व भाजपने केलेला प्रचार या महत्वाच्या बाबीबरोबरच बुथलेवल पर्यंत असणारे कार्यकर्त्याचे नेटवर्क या महत्वाच्या बाबी या विजयास कारणीभूत आहे.तर सहानुभूती व निव्वळ मतदारांचा सहभाग, कमी कार्यकर्त्याची फौज,बुथलेवल पर्यंतची कार्यकर्त्याची कमतरता याबाबी भगिरथ भालके यांना पराभूत होण्यास कारणीभूत ठरले.बाकी वरीष्ठ पातळीवरुन येऊन दोन्ही बाजुनी येऊन प्रचार केला त्यांनी नेमका किती फरक पडला हा संशोधनाचा विषय आहे.


