Uncategorized

खासदार शरदरावजी पवार हे राजकारणाच्या पलीकडील व्यक्तिमत्त्व होय- डॉ. एम. बी. शेख

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदरावजी पवार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आयोजित कृतज्ञता सप्ताह सांगता समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. एम. बी. शेख, यावेळी मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, समाधान काळे, अॅड. गणेश पाटील व इतर मान्यवर.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर – “खासदार शरदरावजी पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते समाजातील विविध प्रश्नांचा अभ्यास करतात. राजकारण, समाजकारण, शिक्षण, कृषि, कला आणि क्रीडा या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या विकासाला वेगळ्या उंचीवर पोहोचवणारे आहे. रयत शिक्षण संस्थेचे त्यांनी गेली 32 वर्षे सक्षमपणे नेतृत्व केले आहे.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि थोर उद्योजक डॉ. एम. बी. शेख यांनी केले.

खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात प्रथम क्रमांक मिळवलेल्या साक्षी संगाप्पा सरगर यांना पारितोषिक प्रदान करताना प्रमुख पाहुणे डॉ. एम. बी. शेख, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, समाधान काळे, अॅड. गणेश पाटील व इतर मान्यवर.
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय पंढरपूर, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पद्मविभूषण शरदरावजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, थोर उद्योजक महादेव बाड, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य सुभाषआबा सोनवणे, एड. गणेश पाटील, ज्योतीराम धायगुडे सर, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य बी. आर. शिंदे सुपरवायझर युवराज अवताडे, शारीरिक संचालक डॉ. सचिन येलभर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. एम. बी. शेख पुढे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. बहुजनांची मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आली पाहिजेत. आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत झाले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रयतच्या प्रत्येक शाळेवर संगणक पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी केली.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ. दत्ता डांगे यांनी केले; तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. दत्तात्रय काळे यांनी करून दिला. या कार्यक्रमात खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत विजेता ठरलेल्या स्पर्धकांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. या स्पर्धेत पुरुष गटात अंकुश लक्ष्मण हाके-प्रथम क्रमांक, दादा प्रकाश शिंगडे-द्वितीय क्रमांक, अमोल नानासाहेब आमुने-तृतीय क्रमांक, समाधान राघू पोकळे-चतुर्थ क्रमांक, कुणाल वाघ-पाचवा क्रमांक, शिवाजी भारत हाके-सहावा क्रमांक. तर उत्तेजनार्थ एकूण सहा बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये निरंजन विलास सावंत, पवन विलास सुरवसे, निखार भालावी, पृथ्वीराज भागवत तागडे, सुमित अविनाश जावीर व शुभम सुधाकर मोरे यांनी ही पारितोषिके पटकावली.

खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक मिळवलेले अंकुश लक्ष्मण हाके यांना पारितोषिक प्रदान करताना प्रमुख पाहुणे डॉ. एम. बी. शेख, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, समाधान काळे, अॅड. गणेश पाटील, डॉ. दत्तात्रय काळेल व इतर मान्यवर.

या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्ठम या क्रमांकांना अनुक्रमे बारा हजार बारा, सात हजार बारा, पाच हजार बारा, चार हजार बारा, तीन हजार बारा आणि दोन हजार बारा अशी बक्षिसे देण्यात आली तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना बाराशे बारा रुपयाची एकूण सहा बक्षिसे देण्यात आली. महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेत साक्षी संगप्पा सरगर प्रथम क्रमांक, श्रद्धा भारत हाके द्वितीय क्रमांक, कोमल नामदेव सरगर-तृतीय क्रमांक, कोयल खपाले-चतुर्थ क्रमांक, पूजा चंद्रकांत माने-पाचवा क्रमांक व गायत्री संतोष मासाळ-सहावा क्रमांक अशी बक्षिसे देण्यात आली. उत्तेजनार्थ एकूण सहा बक्षिसे देण्यात आली. ऐश्वर्या चंद्रशेखर हिरेमठ, अश्विनी इगवे, प्राजक्ता तायाप्पा शिंदे, काजल नदाफ, सानिका संतोष कापसे व गौरी बाळासाहेब माळी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.

खुल्या राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक….

चित्रकला स्पर्धेत विठ्ठल कुणाल पवार-प्रथम क्रमांक, पायल इकबाल चव्हाण-द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत अभिजीत लांबकाने-प्रथम क्रमांक, सोनाली संजय सूर्यवंशी-द्वितीय क्रमांक, करिष्मा नागनाथ जाधव-तृतीय क्रमांक, निबंध स्पर्धेत प्राजक्ता गणेश जाधव- प्रथम क्रमांक, रूपाली पांडुरंग देवकते -द्वितीय क्रमांक, सोनाली संजय सूर्यवंशी-तृतीय क्रमांक, रांगोळी स्पर्धेत तेजस्विनी सासवडे-प्रथम क्रमांक, स्नेहल वाघमारे-प्रथम क्रमांक, स्नेहल परचंडे-द्वितीय क्रमांक, कोमल संतोष गळवे-तृतीय क्रमांक तर आनंद खरात व देवकी कांबळे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवली. खासदार शरदरावजी पवार यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात 50 वर्षात दिलेल्या भरघोस योगदानानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या सांगता समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “शरदरावजी पवार यांना पुरोगामी विचारांचा वारसा त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्याकडून लाभला. राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र महाराष्ट्रात झालेल्या किल्लारी भूकंप व मुंबई येथील बॉम्बस्फोट यानंतरची परिस्थिती हाताळण्याचे त्यांनी केलेले कार्य हे महत्वपूर्ण होते. रयतच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाता यावे; यासाठी त्यांनी पाच कोटी इतका निधी सीड मनी म्हणून उपलब्ध करून दिला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी जगामधील थोर शास्त्रज्ञांना उपलब्ध करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close