महापुरुषांच्या बद्दल इथून पुढे जर अपशब्द वापराल तर याद राखा प.महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कांबळे यांचा इशारा

अविनाश कांबळे
अध्यक्ष- पश्चिम महाराष्ट्र पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत
पुणे:- माणसाला माणूस पण आणून देणारे आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करून स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे असे पुरोगामी विचार आणी या पुरोगामी विचारावर महाराष्ट्राने संपूर्ण जगाला एकीचा संदेश देणारे फुले, शाहू आंबेडकर या थोर पुरुषांच्या बदनामीचा जाणीवपूर्वक गट रचला जात असून भविष्या मध्ये या महापुरुषांना जर बदनाम कराल तर याद राखा असा सज्जड दम पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र युवक चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना अविनाश कांबळे म्हणाले की यापुढे महापुरुषांच्या बदनामीचा निषेध केवळ शाई अंगावर टाकून किंवा पुतळे जाळून केला जाणार नाही तर अशी बदनामी करणाऱ्या समाजकंटकाला त्याचं पद त्याची प्रतिष्ठा न बघता हर चौकात सर्व समक्ष त्याचा पुरोगामी संघर्ष परिषद हिशोब चुकता करेल.