Uncategorized

विवेक वर्धिनीत डॉ.बाबसाहेबआंबेडकर यांना अभिवादन

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे 6 डिसेंबर या महामानव, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.या वेळी प्रशालेचे मुख्य लिपिक हनुमंत मोरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी देखील आपले जीवन चारित्र्यसंपन्न जगावे असा संदेश दिला.यावेळी प्रशालेतील इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनिनी भाषणे केली त्या मध्ये गायत्री देवमारे,पायल शिंदे, रिया पिसे, अनुष्का माने, प्रतीक्षा कांबळे, श्रुतिका लालबोंद्रे, सृष्टी बागडे प्रणाली नाळे ,सृष्टी भागानगरे ,प्रतीक शिंदे, प्रथमेश पोरे, विक्रांत सातपुते, अभिनव व्हटकर यानी विचार मांडले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक राजूभाई मुलाणी यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक राजन शिंदे, संजय क्षीरसाग,सुनील विश्वासे, बबन कोकतरे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे यांनी मानले
यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close