Uncategorized

यश वधू वर सूचक मंडळ मिणचेने सामाजिक बांधिलकी जपली–.    प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरात भव्य मातंग वधू वर सूचक मेळावा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

कोल्हापूर:- यश वधू वर सूचक मंडळ हे राज्यस्तरावरील एक व्यापक मातंग समाजाचे वधू वर सूचक मंडळ असून गेली 25 वर्षे या वधुवर सुचक मंडळाने संस्थापक राजू दादा घाटगे यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना नात्याच्या धाग्यात गुंफण्याचं विश्वासहार्य काम केलं आहे.

राजू दादा घाटगे हे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष असल्याने पुरोगामी संघर्ष परिषद व यश वधू वर सूचक मंडळ याच्या माध्यमातून मातंग समाजाची नाती जुळवत असताना याला व्यापक रूप देताना जातीच्या पलीकडे सुद्धा यश वधू वर सूचक मंडळाने आपली वाटचाल करावी असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक येथील मातंग वधु वर सुचक मंडळाचे मेळाव्यात अध्यक्षीय भाषणामध्ये केले.


स्वागत व प्रास्ताविकामध्ये बोलताना यश वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष व पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे म्हणाले की, समाजातील सुशिक्षित व नोकरदारानीआपण कितीही पुढे गेलो तरी समाजाप्रती असलेले आपले ऋण फेडण्यासाठी समाजाला सोबत घेऊन गेले पाहिजे यासाठी समाजाकडे पाठीमागे वळून बघितले पाहिजे व समाज एक संघ कसा राहील याची मनातून तळमळीने बांधणी केली पाहिजे तरच समाज एकसंघ राहील मगत मातंग वधू वर सूचक मंडळाचे काम यशस्वी झाले असं मी समजेन.


यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, राज्य महासचिव मारुतीराव बोभाटे यांची भाषणे झाली.
सदर कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसाभाई मुल्ला, जनार्धन घाटगे, दौलत घाटगे ,रवी हंकारे, प्रशांत जाधव, गणेश घाटगे,शिवाजी घाडगे (महाराज),शरद घाटगे, अनिल घाटगे, सांगली जिल्हा शहर अध्यक्षा लीलाताई बनसोडे इत्यादी पदाधिकारी व लातूर, जालना, बीड, सातारा, कोल्हापूर,सांगली,सोलापूर, नांदेड जिल्ह्यातून आलेले पालक व वधू वर उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close