ब्राम्हणवादी व भांडवलदार यांच्या वर्चस्वातून संविधान मुक्त करा— प्रा. प्रभाकर निसर्गगंध …

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
डाँ.रामदास नाईकनवरे सांगली जिल्हा प्रतिनिधी
आटपाडी – दि.21/11/2022
भारतीय संविधान निर्मितीपूर्व काळामध्ये आपल्या देशाच्या सामाजिक, आर्थिक , शैक्षणिक , अँग्रीकल्चर , आरोग्य , दळणवळण इ. क्षेत्रामध्ये भारतीय नागरीकांचे कोणतेही अस्तित्व नव्हते , पण 1950 नंतर राष्ट्रनिर्मितीच्या पायाभूत सुविधा अंतर्गत विकास योजनांच्या माध्यमातून संबंध भारतीय नागरीकांचे मुलभूत अस्तित्व निर्माण झाले. परंतु 1980 च्या नंतर मात्र भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीत व निर्णय प्रक्रियेवर ब्राम्हणवादयांचे व भांडवलदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यामुळे देशातील बहुजनांचा संर्वागिण व मुलभूत विकास संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे समस्त् भारतीयांनी भारतीय संविधानाला ब्राम्हणवादयाच्या व भांडवलदाराच्या वर्चस्वातुन मुक्त करावे. असे अवाहन जेष्ठ अभ्यासक व विचारवंत प्रा. प्रभाकर निसर्गगंध यांनी केले. फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते भारतीय संविधानासमोरील वर्तमान आव्हाने या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
भारतीय संविधानाच्या लोकशाही मूल्यांना न जुमानता सर्वंच राज्यकर्त्यांनी भारतीय संसदेला आपल्या हातचे बाहुले बनविले आहे. देशातील सर्व न्यायपालिका , तपासयंत्रणा न्यायाच्या भूमिकेत राहिलेल्या नसून येणा-या दहा वर्षाच्या काळात आपल्या देशात लोकशाहीची मूल्ये दिसणार नाहीत. अशी भिती व्यक्त करून खाजगीकरणाच्या माध्यमातुन हा देश कंगाल करण्याचा ब्राम्हणवादयांचा कुटील डाव आहे. असेही त्यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲङ सुजित लाळे हे होते. प्रत्येक नागरीकाने संविधानाचे रक्षक बनून लोकशाहीची प्रक्रीया गतीमान करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली . यावेळी या व्याख्यानमालेचे स्वागत अध्यक्ष व फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. या संबंधी आपले विचार सुरेश मोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले. संतोष काटे यांनी अत्यंत सुदर असे सुत्रसंचालन केले व सुषमा खरात यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण मोटे, प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , नामदेव खरात , भिमराव कदम , अक्षय बनसोडे , किरण जावीर , शाम ऐवळेसर , सुनिल ऐवळे जिल्हा संघटक दादासो वाघमारे , धनजंय वाघमारे, विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे , भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर यांच्यासह असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.


