Uncategorized

गायरान जमिन अतिक्रमण निर्णय प्रकरणी शिवसेनेचे आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-उच्चन्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे राज्यसरकारला आदेश दिल्याने शासन त्याची अंमलबजावणी करणार असून हा निर्णय गोरगरीब जनतेवर अन्याय करणारा असून प्रत्येक कुटुंबाला घर मिळाले पाहीजे या पंतप्रधान यांच्या धोरणाविरोधात असल्याने शासनाने यानिर्णयाबाबत फेर विचार याचिका दाखल करावी असे आहवान शिवसेना तालुका प्रमुख संजय घोडके यांनी केले.

गायरानात अनेकांनी आपला निवारा म्हणून घरे उभारली असून शासनाने त्यांना विज कनेक्शन, रस्ते,गटारी आरोग्य सुविधा पुरविल्या असुन शौचालय उभारण्यास अनुदान दिले असुन त्यांचेकडुन टँक्स हि वसुल केला आहे.तरी शासनाने याबाबिचा सकारात्मक विचार करुन हि अतिक्रमणे कायम करावीत अशी मागणी केली आहे.

शिवसेने उध्दव ठाकरे गटाच्या वतिने तहसील कार्यालय येथेआंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या वतिने नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी डीपीआय,छावा या संघटनेनी पाठींबा दिला.

यावेळी संजय घोडके, काकासाहेब बुरांडे, लंकेश बुरांडे यांचेसोबत डीपीआयचे शहराध्यक्ष अमित अवघडे,उपाध्यक्ष विशाल तुपसौंदर, मार्तंड कांबळे याचेसह तालुक्यातुन कानिफनाथ चव्हाण ,भागवत सरवदे, कोंडिराम शिंदे बाभुळगाव,गणेश वाघमारे, रामभाऊ सुरवसे,श्रीनिवास उपलकर,विशाल डोंगरे,महाविर हाके खरातवाडी,रामभाऊ पवार गार्डी,दयानंद भोसले सरकोली,उमेश काळे चिलाईवाडी,बाळासाहेब पवार रोपळे, सुखदेव कोरडे जाधववाडी,विजय बागल गादेगाव,संजय पवार बोहाळी,रमेश लोखंडे, संजय घोडके, अशोक गायकवाड अनिल माळी ,स्वप्निल गावडे वाखरी,विजय जाधव, महेश कांबळे, गौशपाक आतार,रेवनाथ जमदाडे,सचिन कांबळे, राहुल कांबळे, सतिश चंद्रराव,तावशी,दर्याबा हेगडे तिसंगी,अर्जुन येडगे,लखन अडगळे, मारुती सावंत भटुंबरे,प्रशांत बागडे, शामराव सुरवसे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close