मिणचे येथील 15% मागासवर्गीय विकास निधीची होणार खातेनिहाय चौकशी गटविकास अधिकार्याने दिले लेखी आश्वासन
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या यशस्वी आंदोलनांची मालिका सुरूच

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या मरण उपोषणा प्रसंगी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी लेखी पत्र देताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे, उपाध्यक्ष राजू घाटगे,गणेश घाटगे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
हातकणंगले:- हातकणंगले तालुक्यातील मिणचे ग्रामपंचायतीने वार्षिक वसुलापैकी पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करावयाचा असतो परंतु तसे न करता गेली पाच वर्ष सदर विकास निधी मागासवर्गीयांच्यासाठी न वापरता इतरत्र वापरून पूर्ण भ्रष्टाचार केल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा सदर ग्रामपंचायत दखल घेत नव्हती याचा पुढचा टप्पा म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केल्याने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी यांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सर्वच मागण्या पूर्ण करण्याचे व गेल्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची खाते न्याय चौकशी करून द अफरातफर करणार्या दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी पत्र दिल्याने पुरोगामी संघर्ष परिषदेने आमरण उपोषण राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर मागे घेतले.
गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांचे हस्ते लिंबू सरबत देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू घाटगे व वरिष्ठ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश घाटगे यांचे नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, हातकणंगले तालुकाध्यक्ष रवींद्र हंकारे , हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, बाजीराव घाटगे इत्यादींनी भाग घेतला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सौ. सुनीता खटावकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन आवळे ,कोल्हापूर जिल्हाध्यक्षा राधा कांबळे,वैशाली कांबळे, मोहसिन मुजावर, संभाजी चौगुले इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




