Uncategorized
पंचनामे करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाणार”… संजय घोडके.
मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही शेतकऱ्याच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करण्याचे टाळले जात आहेत याबाबत दिले तहसीलदार यांना निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाने थैमान मांडलेले आहे. शेतकऱ्याच्या शेतातील खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. कर्जबाजारी असलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. या शेतकऱ्यांचे शेतातील पिकाची नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री यांची असून देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिका चे नुकसानीचे पंचनामे करा. असे आदेश दिलेले असताना देखील संबंधित अधिकारी पंचनामे करत नसल्याचे दिसून येत आहे. आम्हाला वरून आदेश आलेले नाहीत असे बोलून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची ज्याप्रमाणे नुकसान झालेले आहे.

त्याचप्रमाणे कित्येक गावा मधील घराघरांमध्ये हे पावसाचे पाणी गेलेले आहे. त्यांच्या कुटुंबातील संसार उपयोगी साहित्याची नुकसान झालेले आहे. त्यांचे देखील पंचनामे शासनाने करावी. अन्यथा पंढरपूर तालुका शिवसेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे पंढरपूर तालुका शिवसेनाप्रमुख संजय घोडके यांनी आपल्या निवेदनामध्ये आपले मत व्यक्त केले. हे निवेदन तहसिलदार सुनील वेल्हेकर यांना दिले.यावेळी शिवसैनिक काकासाहेब बुरांडे राजाभाऊ पवार असे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.



