शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावेत डि पी आयची मागणी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
हातकणंगले:-गायरान, गावठाण जमिनीमध्ये अतिक्रमण करून रहात असलेल्या लोकाना त्यांच्या नावावर जागा करून द्या. शासन निर्णय क्रमांक ग्रामविकास विभाग प्र आयो – 2017 / प्र क्र 3481/ योजना – 10 दिनांक 16/02/2018 या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 50 वर्षा पूर्वीपासून शासकीय गायरान, वन, मुलकीपड जमिनीमध्ये अतिक्रमणे करुन रहात असलेल्या लोकाना ती जमीन जागा नावावर नसल्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या सोयी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागासवर्गीय व सवर्ण लोक हे रहायला जागा नसल्यामुळे त्या लोकांनी वरील जागेवर कायम अतिक्रमण करून वास्तव्य केले आहे. अनेक वर्षांपासून त्या जागेमध्ये रहात असलेल्या लोकाना त्या ठिकाणी लाईट, पाणी ,रस्ते, गटारी वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह या सोयी सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे. तरी आमच्या मागण्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हा मागासवर्गीय व गोरगरिबाना ती जागा नावावर करून तात्काळ मिळावी. यासाठी आज दिनांक। १७/८/२०२२ रोजी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष विकास अवघडे यांच्या नेतृत्वाखाली आसूड आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.निवदनामध्ये खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
1) भादोले ताः हातकणंगले येथील गायरान जमीन 2266 गट नंबर मध्ये रहात असलेल्या सर्व लोकांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे.
2) भादोले येथील गायरान अतिक्रमण धारकास सर्वच घरकुल योजनेतील घरकुले देण्यात यावीत.
3) प्रधानमंत्री घरकुल योजना व रमाई घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान हे महागाईच्या पटीत वाढ करुन मिळावे .
या प्रमुख मागण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून डि पी आय पक्षाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आज दिनांक 17/08/2022 रोजी आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.
सदर आंदोलनाची दखल येत्या काही दिवसांत कार्यवाही न झाल्यास. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाच्या वतीने कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्ग वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा हातकणंगले तालुका अध्यक्ष विकास अवघडे यानी दिला
यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे,जि.अध्यक्ष.दादासो माने,जि.सल्लागार भिकाजी अवघडे,ग्रा.जि.अध्यक्ष बबनराव शिंदे,संघटक अर्जुन समुद्रे,जि.कार्यध्यक्ष रोहित माटे, ता.उपध्यक्ष अमर धनवडे,बाबसो गावडे, सुनिल कांबळे,अजित लोखंडे,सुरज अवघडे,सैरभ शिंदे,माणिक धनवडे,यासह अनेक पदधिकारी, कार्यकर्ते, अतिक्रमणे धारक उपस्थित होते.


