Uncategorized

येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना  घर द्या अन्यथा नवनिर्माण सेना घरांचा ताबा घेणार : दिलीप धोत्रे

पंढरीत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घर मिळेना,प्रशासनाची उडवाउडवीची उत्तरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर येथील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराचे पैसे भरूनही नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे गेली एक वर्षांपासून घरापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या आठ दिवसात लाभार्थ्यांना घर न दिल्यास नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व घरांचा ताबा घेणार असल्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिला आहे.

पंढरपूर शहरातील नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने राबवली जात आहे. मात्र गेली काही वर्षापासून घराचे पैसे भरूनही लाभार्थ्यांना घर मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यामधील लाभार्थ्यांनी बँकांकडून तसेच काही जवळची रक्कम यासाठी नगरपालिकेला भरली आहे. मात्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे पैसेचे व्याज वाढत चालले असल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहे.नगरपालिकेने हि जागा बिल्डरला फुकटात दिली आहे नियमाप्रमाणे ४०%घरे बिल्डरने डेव्हलप करुन नगरपालिकेला दिले पाहीजे होते व नगरपालिकेने गरजुंना स्वस्तात घरे दिली पाहिजे होती.

 

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी या पंतप्रधान आवास योजनेतील सर्व घरांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत लाभार्थ्यांना घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटून लाभार्थ्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.यावेळी शहराध्यक्ष संदीप कवडे,तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील,जयवंत भोसले यांचे सह पैसे भरणारे अनेक नागरिक उपस्थित होते.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close