मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नी शिंदे सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू -प्रा. सुभाष वायदंडे
पुरोगामी संघर्ष परिषद नामफलक उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे

विठ्ठलवाडी- (ता.कराड)- मातंग समाजाच्या विकासाच्या अनेक योजना व लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा निधी तसेच अण्णाभाऊ साठेंचे स्मारक असे अनेक समाजाचे प्रश्न युती शासनाच्या काळामध्ये फक्त घोषणा करून कागदावरच दिमाखात दिसतायेत या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शिंदे सरकारवर दबाव आणून समाजाच्या हिताचे योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू असं प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते विठ्ठलवाडी (तालुका कराड) येथे संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.

पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे विठ्ठलवाडी(ता. कराड) येथे नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलताना व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे, जिल्हाध्यक्ष इंद्रजीत चव्हाण व इतर
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे म्हणाले समाजाचे कणखर नेतृत्व पुढे न आल्यामुळे समाज विकासापासून बाजूला राहिला.
स्वागत कराड तालुका अध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय साठे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा (भाई) मुल्ला, सातारा जिल्हाध्यक्षा महिला आघाडी सुकेशिनी साठे,सांगली जिल्हा अध्यक्षा युवती वनिता सोनवले यांची भाषणे झाली.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कराड तालुका उपाध्यक्ष सीमा साठे, कराड तालुका उपाध्यक्ष रमेश साठे, शाखाध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, तुषार चव्हाण ,खजिनदार सागर मलगौंडी, संपर्कप्रमुख गुलाब साठे, सेक्रेटरी सागर चव्हाण,कार्याध्यक्ष अधिक चव्हाण, सदस्य विश्वनाथ चव्हाण ,ओंकार चव्हाण ,संतोष चव्हाण, आदित्य चव्हाण, मंगेश आवळे, सुजय चव्हाण, गणेश चव्हाण, प्रमोद चव्हाण, अमित चव्हाण ,प्रतीक चव्हाण ,गणेश बडेकर, वैभव चव्हाण ,श्रवण चव्हाण, श्रीधर चव्हाण, महेश चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सुनील चव्हाण, विठ्ठल टोमके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार शाखाध्यक्ष अमोल चव्हाण यांनी मानले.


