Uncategorized

प्रबोधन चळवळतील मातंगाची शौर्यगाथा” या पुस्तकावर पंढरीत चर्चासत्राचे आयोजन

म.फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त "समता फाऊंडेशन" चा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- म.फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त प्रा.शरद गायकवाड(कोल्हापुर) लिखीत “प्रबोधन चळवळतील मातंगाची शौर्यगाथा” या पुस्तकावर पंढरीत “समता फाऊंडेशन” ने १७ एप्रील रोजी सकाळी १० वाजता विठ्ठल ईन सभागृह चर्चासत्राचे आयोजन केला असल्याची माहिती दत्तात्रय कांबळे सर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या चर्चासत्रामध्ये प्रा.डाँ.दत्ता डांगे,प्रा.डाँ.बालाजी वाघमोडे,डाँ. बिभीषन रणदिवे, अमरजीत पाटिल, प्रा.डाँ. धनंजय साठे, व डाँ. शरद गायकवाड आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी बहुजन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार असुन या चर्चासत्रासाठी चळवळीतील कार्यकर्ते बंधु भगिनीनी उपस्थीत रहाण्याचे आवहान डाँ.बापुसाहेब चंदनशिवे, डाँ. नितिन रणदिवे दत्ता कांबळे सर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close