सेट परीक्षेत ‘कर्मवीर’चे तब्बल नऊ शिक्षक आणि विद्यार्थी उत्तीर्ण


कु. उज्ज्वला बाळू शिंदे – मराठी,विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

गणपत जालिंदर ताड – इंग्रजी,विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

धनंजय शिवाजी कदम – भूगोल,विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

समाधान पिटू गायकवाड – इलेक्ट्रोनिक्स विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

, दीपाली कवडे राज्यशास्त्र,विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

विशाल साधू फडतरे – राज्यशास्त्र,विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

लहू नामदे – भौतिकशास्त्र विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

, आशिष रणदिवे – भौतिकशास्त्र विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण

संदीप काळे भौतिकशास्त्र विषयातुन सेट परीक्षा उत्तीर्ण
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे तब्बल नऊजण एकाचवेळी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून राज्य पातळीवर प्राध्यापक पात्रता परीक्षा(सेट) घेण्यात येते. वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ही पात्रता परीक्षा असून या परीक्षेतील काठिण्य पातळी विचारात घेता ही परीक्षा पास होणाराचे प्रमाण हे नगण्य असते. त्यामुळे महाविद्यालयातून एकाच वेळी ही परीक्षा पास होणाराचे प्रमाण वाढल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत कु. उज्ज्वला बाळू शिंदे – मराठी, गणपत जालिंदर ताड – इंग्रजी, धनंजय शिवाजी कदम – भूगोल, समाधान पिटू गायकवाड – इलेक्ट्रोनिक्स, दीपाली कवडे राज्यशास्त्र, विशाल साधू फडतरे – राज्यशास्त्र, लहू नामदे – भौतिकशास्त्र, आशिष रणदिवे – भौतिकशास्त्र आणि संदीप काळे भौतिकशास्त्र या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. सेट परीक्षेत मिळालेल्या या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्रिं. डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडीटर प्रिं. डॉ. शिवलिंग मेणकुदळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल यांनी अभिनंदन केले.






