कर्मवीर’ मध्ये ‘साहित्य संशोधनावर’ एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
११फेब्रुवारी रोजी आँनलाईन पध्दतीने तज्ञ मार्गदर्शन करणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषा व साहित्य : संशोधनाचे पद्धतीशास्त्र आणि शोधप्रबंध लेखन’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. सदरची कार्यशाळा पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांना उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे याचा लाभ सर्वांनी घ्यावा.’ असे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर डॉ. चांगदेव कांबळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले आहे.
सदर कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. विद्यागौरी टिळक या उद्घाटक व बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार करणार आहेत. या कार्यशाळेत प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे सोलापूर, प्रा. डॉ. रविकांत शिंदे बार्शी, प्रो. वामन जाधव मोंडनिंब, प्रो.डॉ. सुहास पुजारी सोलापूर, प्रो. डॉ. भारती रेवडकर बार्शी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. बिरा पारसे आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रो. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. डॉ. दत्ता डांगे, प्रा. सारिका भांगे, सुरेश मोहिते हे विशेष परिश्रम घेत आहेत.






