महिला नेत्यांबद्दल दारू पितात असे अपशब्द हे बंडातात्या कोणत्या दुकानातून बोलले ?–सौ.स्वाती सौंदडे
अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला यापुढे बंडातात्याना प्रबोधन करण्यापासून रोखणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- बंडातात्या कराडकर महाराज यांनी महिला नेत्याविषयी दारुसंबधी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत. यांचं वय झाल्यामुळे आणि ते नेमके कोणत्या दुकानात बसून हे बोलले याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तात्या जर त्याच दुकानातून बोलले असतील तर तो दोष तात्यांचा नाही आणी तात्यांच्यावरचे संस्कार आहेत त्याचा जर विचार केला तर मग तात्या असे का बोलले याचा शोध घेणे गरजेचे असून तात्यांनाच त्यावेळी त्यांच त्यांनाच न समजल्यामुळे. असे बोलले असावे तसा अर्थ जर घेतला तर वावगे ठरणार नाही असे परखड मत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तात्यांचा मुलामा लावून निषेध व्यक्त करताना केले आहे.
सौ. सौंदडे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांना नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली आहे. पुरुष प्रधान संस्कृती महाराष्ट्र मधून हद्दपार करायची असेल तर सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांना 70 टक्के आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मग तात्या कराडकर यांच्यासारख्या बेताल समाजसेवकाला महिला चांगल्या प्रकारे धडा शिकवतील बंडातात्या कराडकर यांना वेळीच आवरा आणि इथून पुढं समाजामध्ये त्यांनी प्रबोधन करू नये जर बंडातात्या प्रबोधनासाठी बाहेर पडले तर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला बंडातात्या यांना रस्त्यावरच रोखतील असा प्रसिद्धीपत्रकात इशाराही त्यांनी दिला आहे.