Uncategorized
भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक, कला क्रिडा मंडळाचे वतिने रमाई जयंती निमित्त कोवँक्शिन व कोविशिल्ड लस व गरजुंना मोफत चष्मा वाटप होणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक, कलाक्रिडा मंडळाचे वतिने रमाई माता जयंती निमित्त ७फेब्रुवारीरोजी १५ते१८वयोगटातील मुला मुलींकरीता कोवँक्शिन व १८वयाच्या पुढील महिला व पुरुषाकरिता कोविशिल्ड लस पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच सावित्रीमाई फुले जयंती निमित्त आयोजित केलेल्या नेत्ररोग शिबिरातील नेत्र तपासणी करुन ज्यांना नंबर दिला आहे अशा गरजु महिलांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ युवानेते उमेश सर्वगोड यांनी दिली.
तरी भीमशक्ती व्यायाम शाळा,महापूर चाळ,संतपेठ येथे सकाळी११ते दुपारी २ वाजेपर्यत सर्वानी उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवहान सुधीर (लखन)सर्वगोड,अक्षय कदम,मिलिंद सर्वगोड यांनी केले आहे.