पुरोगामी संघर्ष परिषदेचे सबलीकरण योजनेसाठी कराड तहसीलदारांना निवेदन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कराडचे नायब तहसीलदार आनंदराव दरेकर यांना निवेदन देताना प्राचार्य बाळासाहेब साठे, जिल्हाध्यक्ष आधिक चव्हाण, तालुकाध्यक्ष शंकर चव्हाण, सुभाष साळुंखे ,संजय साठे, रमेश साठे इत्यादी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कराड:- कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेसाठी ज्या अटी लादण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे कराड तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे व तालुकाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सदर योजनेच्या अटी शिथिल करण्यासाठी कराडचे चे नायब तहसीलदार श्री आनंदराव दरेकर यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या प्रति एकरी शासकीय दर तोकडा असून तो दर बाजार भावा प्रमाणे निश्चित करावा. 50 टक्के सबसिडी ऐवजी बाजार भाव मिळावा. लाभार्थीला जिल्ह्यात कुठल्याही गावात जमीन घेता यावी. प्रत्येक गावातील वीस टक्के खरेदीचे व्यवहार सदर योजनेसाठी राखून ठेवावेत किंवा शासनाने गायरान जमिनी ताबडतोब सदर योजनेसाठी वितरित कराव्यात या व अशा अनेक मागण्या या योजनेसाठी करण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय संजयराव साठे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक मा. सुभाषराव साळुंखे, पश्चिम महाराष्ट्राचे महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ सीमा साळुंखे, सातारा जिल्हा दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, कराड तालुका उपाध्यक्ष रमेश साठे, कराड तालुका संघटक आबासाहेब साठे, तालुका सरचिटणीस आकाश नेटके ,तालुका अध्यक्षा सुकेशिनी साठे इत्यादी पदाधिकारी
उपस्थित होते.