पुरोगामी संघर्ष परिषदेचे सबलीकरण योजनेसाठी तहसीलदारांना निवेदन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने आटपाडी तालुक्याचे नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देताना प.म. अध्यक्षअमोल लांडगे, तालुकाध्यक्ष सागर लांडगे, वैभव पाटील, यश नाईक नवरे इत्यादी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी:– कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेसाठी ज्या अटी लादण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे आटपाडी तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे तालुकाध्यक्ष सागर लांडगे यांच्या उपस्थितीत सदर योजनेच्या अटी शिथिल करण्यासाठी आटपाडी चे नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या प्रति एकरी शासकीय दर तोकडा असून तोदर बाजार भावाने प्रमाणे निश्चित करावा 50 टक्के सबसिडी ऐवजी बाजार भाव मिळावा लाभार्थीला जिल्ह्यात कुठेही जमीन मिळावी प्रत्येक गावातील वीस टक्के खरेदीचे व्यवहार सदर योजनेसाठी राखून ठेवावेत किंवा शासनाने गायरान जमिनी ताबडतोब सदर योजनेसाठी वितरित कराव्यात या व अशा अनेक मागण्या या योजनेसाठी करण्यात आल्या यावेळी यश नाईकनवरे, महादेव वाघमारे, तुषार लांडगे ,आटपाडी तालुका संपर्कप्रमुख वैभव पाटील
उपस्थित होते.






