राजकारणात बरं बोलून लाचार होण्यापेक्षा समाजकारणात खरं बोलून स्वाभिमानी व्हा–राष्ट्रीय अध्यक्ष-प्रा.सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ढालगाव (ता.कवठेमहांकाळ) येथे नामफलकाचे अनावरण प्रसंगी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, शिवसेना तालुका उपप्रमुख धनंजय देसाई लखन वायदंडे ता.अध्यक्ष किशोर कांबळे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
ढालगांव(कवठेमहांकाळ)- राजकारणात पायशाला बसून बरं बोलून लाचारी स्वीकारण्यापेक्षा समाजकारणात उशाला बसून खरं बोलून स्वाभिमानी व्हा असा मंत्र पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी ढालगाव येथे संघटनेच्या शाखा नामफलकाच्या अनावरण प्रसंगी बोलताना दिला. ते ढालगाव (ता.कवठेमंकाळ) या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना कवठेमंकाळ तालुका उपप्रमुख धनंजय देसाई व पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख माननीय लखन वायदंडे होते.
यावेळी बोलताना शिवसेना उपप्रमुख धनंजय देसाई म्हणाले पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक चळवळ तळागाळात पोहोचून समाजाला योग्य न्याय देण्याचं काम करीत आहे. जिल्हाध्यक्षा कु. नयना लोंढे यानी आपल्या भाषणात म्हणाल्या महिलांनी आता चार भिंतीच्या आत राहण्याचे दिवस संपले असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज आहे.

यावेळी पुरोगामी संघाच्या परिषदेचे सांगली जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे ,सांगली शहर जिल्हाअध्यक्ष अतुल वाघमारे, सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत कांबळे, कवठेमंकाळ तालुक्याचे अध्यक्ष किशोर कांबळे, कवठेमंकाळ तालुका वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर भोसले, शाखाध्यक्ष महादेव खवळे ,सागर कांबळे, गोविंद कांबळे ,महादेव कांबळे, प्रकाश कांबळे ,रणजित वाघमारे, रणविर कांबळे, तानाजी देसाई, सोमनाथ मलमे, सुनील माने ,अक्षय वागमारे ,अक्षय कांबळे, सुशांत कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार शाखा कार्याध्यक्ष सुशांत कांबळे यानी मानले.





