राजर्षी शाहू महाराज यांनी वस्तीगृहाची चळवळ चालवली : प्रा. डॉ. किशोर खिलारे
वंचित घटकासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-वंचित घटकाला जे मिळाले नाही ते त्यांना मिळवून देण्यासाठी त्यांना सामाजिक न्याय देणे गरजेचे असल्याचे ओळखून अशा उपेक्षित लोकांना शिक्षण देणे गरजेचे आहें हें ओळखून राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणुन मराठा वसतिगृह सुरु केले या मध्ये ब्राम्हणसोबत ब्राम्हणेतरांच्या सर्व जातीच्या मुलांना प्रवेश दिला. परंतु ब्राम्हणाच्या जातीय वर्चस्वामुळे अनेक ब्राम्हणेतर विध्यार्थ्यांची संख्या घटू लागल्याचे महाराजांच्या लक्षात आल्याने त्यांनी वेगवेगळ्या जाती साठी तसेच जैन, मुस्लिम यांचे साठी वसतिगृह स्थापन करुन त्याकाळी वसतिगृहाची चळवळ सुरु केल्याने अनेकजण शिक्षण घेऊन प्रगत झाले. असे विचार प्रा. डॉ. किशोर खिलारे कोल्हापूर यांनी व्यक्त केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे 150व्या जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंचनें विठ्ठल इन सभागृहात आयोजित केलेल्या व्याख्यानात “राजर्षी शाहू महाराज व सामाजिक न्याय “ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विचारमंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे होते. पुढे बोलतांना खिलारे म्हणाले की मंदिराच्या उत्पनातून मुस्लिम वसतिगृह व दरग्याच्या उत्पनातून हिंदू वसतिगृह चालवून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. इंग्रज व्यापार व सत्ता मिळविण्यासाठी भारतात आले पण येताना ख्रिस्ती मिशनरी द्वारे मानवतेचे विचार घेऊन आले.. त्यामुळेच अनेक भारतीय साता समुद्रापार उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले. राजर्षी शाहू महाराज हीं शिक्षणासाठी परदेशीं जाऊन आले. त्यामुळेच सामाजिक न्यायाची भूमिका ते घेऊ शकले, वंचित घटकाला न्याय देऊ शकले. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करु शकले असे सांगुन शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायावर खिलारे यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले.
यावेळी ऍड. विनायक सरवळे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की शाहू महाराजांनी अनेक कायदे आणले…सर्वाना सक्तीचे शिक्षणाचा कायदा केला., स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले.. स्वतःची विधवा सूनेला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, अंतराजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले त्यासाठी चुलत बहिणीचा अंतरजातीय विवाह केला. मल्लवीद्येला .. प्रोत्साहन दिले.
देवदासी निर्मूलन कायदा… त्यांचे मुलास संपतीत वाटा.देण्याचा कायदा केला…शूद्र अति शूद्रना आरक्षण दिले…त्यामुळे कथित धर्म मार्तंडाचा त्यांना फार त्रास झाला म्हणून राजर्षी शाहू महाराज आजच्या पिढीला माहीत होने गरजेचं आहे.त्यांचा विसर पडला नाही पाहिजे.
अमरजीत पाटील (संचालक रयत शिक्षण संस्था )म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांना फक्त 48वर्षाचे आयुष्य लाभले. त्यात 28 वर्षांचा त्यांना कार्यकाळ मिळाला. त्यांनी अनेक सामाजिक न्यायाची कार्य केले. सदाशिव शास्त्री बेनाडीकर यांना मराठा शंकराचार्य करुन त्यांना विवाह करण्याची परवानगी दिली. आज छत्रपती शाहू महाराजांना मराठ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. फुले शाहू आंबेडकर समजले तरच छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहेत. मानवतेच्या विचार रुजवीणाऱ्या महापुरुषांची मालिका आहे.
त्यांना जसा विरोध होत होता तसाच विरोध त्यांचे विचार पुढे नेणारांना आजही होत आहे त्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणत सुनील वाघमारे म्हणाले की, व्यवस्थेला गदागदा हलवीण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हें देशाचे मोठे पुढारी होतील असे भाकीत माणगांव परिषदेत महाराजांनी व्यक्त केले होते. ते पुढे खरे ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजांनी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करण्याचे अहवान केले होतो. याबाबीचा आपणास विसर पडला असून पुढच्या पिढीस हा इतिहास समजणारच नाही… त्यामुळे सर्वांनी एकत्र होऊन कार्यरत होणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे सुरुवातीस मान्यवारांचे हस्ते राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले.
त्यानंतर सामूहिक संविधान उद्दिषकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड. विकास भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय पाटोळे सर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे यांनी मानले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी अॅड.अखिलेश वेळापुरे,अनिल सावंजी,अभयसिंह देशमुख,इस्माईल कडगे,तुषार खडतरे,राहूल भोसले,विकास भोसले,अॅड. राजेंद्र दांडगे,अॅड.श्रीकांत कांबळे, मोहन अनपट, किरणराज घाडगे,यांचे सह सर्व सल्लागार, पदाधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
♦