Uncategorized

राम मुर्ती स्थापनेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचे पोस्टर झळकवनाऱ्या समाजकंटावर कारवाई करा -अमरजीत पाटील

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर :-अयोध्या येथिल राममंदिरामध्ये राम मुर्ती स्थापनेच्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही समाजसंकटांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी असणार्‍या नथुराम गोडसेचे पोस्टर झळकवत खुन्याचे उद्दातिकरण  केलेले आहे.अशा समाजकंटावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर.

 

आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पुढे ते म्हणतात की,राष्ट्रपिता महात्मा गांधीजींमुळे भारतातील सामान्यातील सामान्य माणूस स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले होते.महात्मा गांधीजींमुळेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला व्यापक स्वरुप प्राप्त झालेले होते.रविंद्रनाथ टॅगोर यांनी सर्वप्रथम महात्मा गांधीजींना “महात्मा” म्हणून गौवरले तर आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांनी “राष्ट्रपिता” म्हणून गौरवलेले होते.अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा खून नथुराम गोडसेने केला होता.हे वास्तव आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या खुन्याचे म्हणजे नथुराम गोडसेचे कुठल्याही मार्गाने उदात्तिकरण करणे हा प्रकार महात्मा गांधीजींचा अपमान करण्याचा प्रकार आहे.सदर प्रकार हा अत्यंत संतापजनक व निषेधार्ह असे आहे.

श्रीराम मुर्ती स्थापने निमित्त पंढरपूर शहरामध्ये विविध संघटनांच्या वतीने मिरवणुकींचे दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आलेले होते.सदर मिरवणुकीमध्ये पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अन्य राजकीय पक्षांचे लहान मोठे नेते सहभागी झालेले होते.याच मिरवणुकीमध्ये काही व्यक्तींनी सावरकरांच्या फोटो सोबत महात्मा गांधीचा खुनी असणार्‍या नथुराम गोडसेचा फोटो झळवलेला सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिसून येत आहे.वास्तविक सदर मिरवणुकींना परवानगी देताना पोलिस प्रशासनाने कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी नियमाना अधिन राहून परवानगी दिलेली असताना,तसेच सदर मिरवणुकांसाठी पोलिस बंदोबस्त असताना,स्थानिक आमदार आणि माजी आमदार व इतर नेते मंडळी उपस्थितीत असताना पोलिसांसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा खुनी असणार्‍या नथुराम गोडसेचे पोस्टर झळकावून केले गेलेले उदात्तिकरण संतापजनक आहे.सदर प्रकार महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक देशभक्ताचा अवमान करणारे आहे.

पंढरपूर शहरात पार पडलेल्या सदर मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणार्‍या समाजकंटकांवर पंढरपूर शहर पोलिसांनी स्व अधिकारात गुन्हा नोंद करुन,कडक कायदेशीर कारवाई करावी.तसेच,सदर प्रकरणी मिरवणुकीमध्ये सहभागी असणार्‍या स्थानिक आमदार आवताडे,माजी आमदार परिचारक व अन्य नेते पक्षीय नेते मंडळींनी आपली महात्मा गांधीजी व नथुराम गोडसे बद्दल भुमिका जाहीर करावी.अशी आम्ही मागणी करित आहोत. अशी मागणी  अमरजित पाटील.जनरल बाॅडी सदस्य,रयत शिक्षण संस्था,सातारा.संचालक,दि.पंढरपूर मर्चंटस् को-ऑप बॅंक,पंढरपूर.संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर. यांनी केली आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close