Uncategorized

आटपाडी तालुक्यातील देवस्थान जमिन प्रश्नी वेळ प्रसंगी तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकण्याचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

आटपाडी:- आटपाडी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी बरेच गावात गावातील धनदांडग्यानी व गुंडानी बळकावून त्याच्यावर प्लॉट विक्री व्यवसाय राजरोसपणे सुरू केला असून काहींनी शेती साठी वापरायला सुरुवात केली आहे अशांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद आटपाडी तालुक्याच्या वतीने आटपाडी तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नायब तहसीलदार राठोड यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय सागर लांडगे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हा इशारा दिला सदर शिष्ठमडळात वैभव पाटील ,प्रशांत लांडगे, योगेश बुधावले, विशाल भिसे, विलास धांडोरे,समाधान कांबळे,वैभव लांडगे इत्यादींचा समावेश होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close