स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीच्या तब्बल १८ विद्यार्थीनींना ‘प्रगती स्कॉलरशिप’ मंजूर
ए.आय.सी.टी.ई.कडून विद्यार्थीनींना सलग चार वर्षे मिळणार रु. पन्नास हजाराची शिष्यवृत्ती

छायाचित्र-स्वेरी लोगो, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व प्रगती शिष्यवृत्ती मिळालेल्या अठरा विद्यार्थिनी अनुक्रमे
साक्षी सालविठ्ठल, आयेशा तांबोळी, पल्लवी बचुटे, माधुरी शिंदे, स्वाती अंबुळे, श्वेता जाधव, मयुरी माळी, मृणाल चौंडावार, साक्षी रणवरे, पूजा इंगळे, साक्षी राजूरकर, प्रणोती नाईकनवरे, प्रेरणा वानखेडे, मोनाली ढेंबरे, वैष्णवी मांडवे, दिपाली मोरे, ऐश्वर्या भोसले आणि ऋतुजा माने
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘मुलांप्रमाणे मुलींनी देखील मर्यादेत न राहता चाकोरी बाहेर पडावे व मोठे व्हावे या हेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणाचा पाया रचला आणि तेथून मुली खऱ्या अर्थाने शिक्षण घेवू लागल्या. मुलींना शिक्षणात आणखी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने ए.आय.सी.टी.ई. अर्थात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (अखिल भारतीय तंत्रनिकेतन परिषद) कडून मुलींच्या तंत्रशिक्षणासाठी हातभार लागावा या हेतूने हुशार आणि गुणवत्तेच्या तत्वानुसार ‘प्रगती स्कॉलरशिप फॉर गर्ल स्टुडंट्स’ नावाने मुलींना शिष्यवृत्ती मिळते. या ए.आय.सी.टी.ई. च्या नियमात बसत असलेल्या स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीमधील प्रथम वर्षात प्रवेश घेऊन शिक्षण घेत असलेल्या आणि मेरीट नुसार अग्रक्रमाने असलेल्या तब्बल अठरा विद्यार्थिनींना प्रत्त्येकी प्रतिवर्षी रु. पन्नास हजाराची ‘प्रगती स्कॉलरशिप’ मंजूर झाली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
ए.आय.सी.टी.ई.च्या नियमानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना प्रवेश घेतल्यानंतर प्रवेशाच्या मेरीटनुसार शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळते. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यापासून ही शिष्यवृत्ती सलग चार वर्षे मिळते. त्यानुसार यंदा २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या साक्षी संजय सालविठ्ठल, आयेशा जब्बार तांबोळी, पल्लवी सुरेश बचुटे, माधुरी राजाराम शिंदे,स्वाती सौदागर अंबुळे, श्वेता हनुमंत जाधव, मयुरी तुकाराम माळी, मृणाल विवेक चौंडावार, साक्षी संदीप रणवरे, पूजा अण्णासाहेब इंगळे, साक्षी चंद्रशेखर राजूरकर, प्रणोती गणेश नाईकनवरे,
प्रेरणा भगवान वानखेडे,
मोनाली बंडू ढेंबरे, वैष्णवी संतोष मांडवे, दिपाली दिलीप मोरे, ऐश्वर्या मोहन भोसले आणि ऋतुजा संजय माने या १८ विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. गरीब व हुशार विद्यार्थ्यांनींना तंत्रशिक्षणासाठी रु. पन्नास हजार रुपये अनुदान मंजूर केल्यामुळे भविष्यात अशा शिष्यवृत्तीमुळे मुलींचा तंत्र शिक्षणाकडे निश्चित कल वाढेल. शिष्यवृत्ती मिळालेल्या अठरा विद्यार्थीनींचे यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह स्वेरीचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मनियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतिश लेंडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी व पालकांनी अभिनंदन केले.