Uncategorized

राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य प्रेरणादायी – स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

 

छायाचित्र- स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालक प्रतिनिधी सुनील घाडगे, दिव्या घाडगे, पोपट पाटील, सुखदेव रोंगे, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी.

 

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- ‘राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊंनी केलेले कार्य पाहता त्यातून एक आदर्श माता समजून येते. माता जिजाऊ हया एक आदर्श कन्या, एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई या विविध नात्यात वावरताना महाराजांना घडविण्यासाठी त्या मुळीच कमी पडल्या नाहीत. त्याचप्रकारे स्वतःच्या हुशारीने समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अभ्यासपूर्ण बदल करण्याचा स्वामी विवेकानंद यांचा प्रयत्न युवा वर्गाला उर्जा देणारा असा आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२४ वी तर स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी पालक प्रतिनिधी सुनील घाडगे (श्रीपूर) यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी असून हा कार्यक्रम स्वेरीच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये साजरा करण्यात आला. पुढे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील महत्वाच्या घटना अधोरेखित केल्या. यावेळी पोपट पाटील, सुखदेव रोंगे, दिव्या घाडगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. यशपाल खेडकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद या विश्वात स्वतंत्र ओळख असणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकून सूत्रसंचालन केले तर डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close