लॉकडाऊनच्या काळात सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सोयीसाठी एसटीची सेवा चालू ठेवा अन्यथा रस्ता रोको करु
पुरोगामी संघर्ष परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला निवेदनाद्वारे इशारा

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सीमावर्ती भागात एसटीची सेवा चालू ठेवण्यासाठी तहसिलदार अनंत गुरव यांना निवेदन देताना लखन वायदंडे ,स्वप्निल बनसोडे, अक्षय खुडे, श्रीमंत कांबळे ,अमोल वाघमारे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सांगली*:- कोरोना काळात सगळेच गैरसोय होत असताना सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या कर्नाटक व महाराष्ट्र हद्दीतील राज्यांतर्गत जवळच्या जवळ ये जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागल्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ताबडतोब सीमावर्ती भागात एसटीची सेवा चालू कराव्यात अन्यथा प्रवाशांची गैरसोय झाल्यास पुरोगामी संघर्ष परिषद सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख लखन वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सांगलीचे जिल्हाधिकारी यांना तहसीलदार अनंत गुरव यांच्या द्वारे दिले आहे.

सदर शिष्टमंडळात पश्चिम महाराष्ट्राचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल बनसोडे ,सांगली जिल्हा महिलाआघाडीच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कु. नयना लोंढे, युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे ,पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष भास्कर खिलारे, अमोल वाघमारे ,महादेव खवळे इत्यादी पदाधिकारी होते.





