पुळूज येथील पूरग्रस्त व धरणग्रस्तांचे पुनर्वसनासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी
पुरोगामी संघर्ष परिषदेचे पंढरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*पंढरपूर*:-दि.४जानेवारी पंढरपुर पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने राज्याचे प्रवक्ते पांडुरंग रणदिवे व सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी, गायकवाड, पंढरपूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब फाळके यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुळूज तालुका पंढरपूर येथील भूकंपग्रस्त व पूरग्रस्त यांना 1993 पासून मूलभूत सोई पासून दूर ठेवल्याबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेने पंढरपूर तहसीलवर मोर्चा काढून देखील कसलीही दखल न घेतल्यामुळे आज पंढरपूरचे प्रांत गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
त्या निवेदनामध्ये 1993 पासून पुळुज शारदानगर येथे मातंग समाज गेली तीस वर्षे राहात असून त्यांना घरकुल लाईट पिण्याचे पाणी यामधली कोणतीच सुविधा मिळत नसल्यामुळे शारदा नगर येथील 106 गट नंबर मध्ये ते राहात असलेल्या जागेवरच त्यांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सदर कुटुंबे पुळुज येथील स्वतःच्या मालकीची सर्व जागा सोडून ते गेली तीस वर्ष शारदानगर या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सदर शिष्टमंडळाला मध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. ज्योती अवघडे ,समाधान कांबळे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वसेकर, तानाजी खिलारे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष खिल्लारे,नेताजी अवघडे, धनाजी गायकवाड, दत्तात्रय कांबळे, उमेश पाटोळे,विक्रम कांबळे,विश्वास कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते






