Uncategorized
भोसे(क) येथे विज्ञान व गणित प्रदर्शन ६ जानेवारी ला होणार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-गुरुवार दि.६जानेवारी रोजी यशवंत विद्यालय भोसे(क) येथे विज्ञान व गणित प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करुन हे प्रदर्शन आँफलाईन पध्दतीने होणार आहे.या प्रदर्शनात १८७ वैज्ञानिक उपकरणे ,खेळणी १२१गणित उपकरणे विद्यार्थी मांडणार आहेत.त्याचप्रमाणे शेकडो गणित व वैज्ञानिक रांगोळी याचे देखील प्रदर्शन होणार आहे.
स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन डाँ.गणेश पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असुन परिसरातील विद्यार्थी, पालक, व शिक्षक यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवहान मुख्याध्यापक दादासाहेब गाडे यांनी केले आहे.






