सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच स्त्रिचं प्रकाशमय जीवन– सौ.स्वाती सौंदडे
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त मुलना शालेय साहित्याचे वाटप करताना पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे, नंदिनी वाघमारे सुजाता कांबळे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली- शैक्षणिक क्षेत्रातील आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका,व समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने तत्कालीन काळात केलेल्या शैक्षणिक योगदानामुळे व समाजाची बंधनं झुगारून दाखवलेल्या धाडसामुळे स्त्रीयांचं जीवन प्रकाशमय झाल्याचे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांनी केले. त्या सांगली (त्रिमूर्ती काँलनी)येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात शालेय मुलांना वह्या व पुस्तके वाटप करताना बोलत होत्या.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सौ सुजता कांबळे सांगली जिल्हा संघटीका सौ. नंदिनी वाघमारे, वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कु. नयना लोंढे, मिरज तालुका अध्यक्षा सरस्वती कांबळे, सांगली शहराध्यक्षा पुनम बेळगी,द्रौपदी सौंदडे,उपदिनी खोत,पूजा सौंदडेकमलव्वा नायकर,पूजा मादीगर,उमा सौंदडे,पूर्वा सौंदडे,प्रसाद सौंदडे,विजयराव सौंदडे,भिमव्वा नायकर इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार आर्चना माळगे यानी मानले.