“मुकनायक”उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांना जाहिर
एनडीजेएम सामाजिक संघटनेच्या वतिने ७जुनला होणार प्रदान
- पंढरपुर:-नँशनल दलित मुव्हमेंट फाँर जस्टिस(एनडीएमजे) या राष्टिय सामाजिक संघटनेच्या वतिने देण्यात येणारा “मुकनायक”उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार सा.जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांना जाहिर करण्यात आला.
संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष धनाजी शिवपालक व शहर प्रतिनिधि रोहित एकमल्ली व अन्य पदाधिकारी यांनी निमंत्रण पत्र नुकतेच श्रीकांत कसबे यांना दिले.यावेळी माजी नगरसेवक अंबादास वायदंडे बहुजन समाज पार्टीचे रवी सर्वगोड उपस्थित होते.
फुले आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्रीकांत कसबे हे गेली बारा वर्ष परखड विचाराचे प्रबुद्ध” साप्ताहिक जोशाबा टाईम्स” च्या माध्यमातुन समाजप्रबोधन करीत असुन अनेक उपेक्षितांना सन्मानित केले आहे.अनेक कवी, लेखक,विचारवंत,यांचे साहित्य प्रकाशित केले आहेत .ज्वलंत विषयावर सातत्याने अग्रलेख लिखाण केले असुन संपूर्ण महाराष्टात जोशाबा टाईम्स पोहचविला जातो. महापुरुषांचांचे विचारावर चालणार्या मोजक्या वृतपत्रात जोशाबा टाईम्स चा समावेश होतो याची दखल घेऊन आमच्या संघटनेच्या वतिने आम्ही हा पुरस्कार संपादक श्रीकांत कसबे यांना जाहिर करत आहोत अशी भुमिका नँशनल दलित मुव्हमेंट फाँर जस्टिस(एनडीएमजे) जिल्हाउपाध्यक्ष धनाजी शिवपालक यांनी व्यक्त केली.
नँशनल दलित मुव्हमेंट फाँर जस्टिस(एनडीएमजे)संघटनेचे राज्य महाअधिवेशन ७जानेवारी२०२२रोजी नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापुर येथे संपन्न होणार असून या अधिवेशनात राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत व अन्य मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार असुन या महाअधिवेशनासाठि सर्व सक्रिय कार्यकर्त्यानी उपस्थीत रहावे असे आवहान धनाजी शिवपालक यांनी केले आहे.