कवियत्री कुमुदिनी काटे-काले यांच्या “सल”काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
मान्यवरांच्या उपस्थित पार पडला सोहळा
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-कवियत्री कुमुदिनी काटे-काले यांच्या “सल”काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा रविवार दि.२जानेवारी२०२२रोजी विठ्ठल ईन सभागृह पंढरपूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डाँ. राजेंद्र शेंडगे ए.आर.बुर्ला महाविद्यालय सोलापुर हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाँ. वामनराव जाधव,प्रा.डाँ. तुकाराम शिंदे,प्रा.सुरेखाताई नागटिळक,बा.ना.धांडोरे प्रा.भास्कर बंगाळे प्रा.शिवाजीराव वाघमारे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते “सल”या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कवियत्री कुमुदिनी काटे-काले यांनी आपले मनोगतातुन काव्यसंग्रहा विषयी आपली भुमीका व्यक्त केली.तर.डाँ. वामनराव जाधव’,प्रा.भास्कर बंगाळे यांनी कविता संग्रहा विषयी व कवियत्री विषयी आपली अभ्यासपूर्ण भूमिका व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा.औदूंबर जाधव,प्रा.सुनिल जाधव प्रा.व्ही.जी.कुंभार,आर.पि.कांबळे,श्रीकांत कसबे संपादक जोशाबा टाईम्स, जैनुद्दीन मुलाणी संपादक युवा राष्टचेतना, यांचेसह अनेक मान्यवरासह कवियत्रीचे कौटुंबिक सदस्य उपस्थित होते
प्रास्ताविक साहित्यीक बा.ना.धांडोरे यांनी केले तर सुत्रसंचलन,प्रा.सुरेखाताई नागटिळक यांनी केले तर आभारप्रा.डाँ. तुकाराम शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी प्रा.जालिंदर काटे यांनी विशेष परिश्रम घेतले.आल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.