स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ए .आय . सी . टी .इ. ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी (अटल) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०५ जुलै ते ०९ जुलै २०२१ या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये ‘डिझाइन थिंकिंग फॉर सोसायटल इंटरप्रेनरशिप’ या विषयावर ऑनलाइन ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ नुकताच संपन्न झाला. ‘संशोधन ही काळाची गरज आहे संशोधन करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन एखाद्या क्षेत्रामध्ये संशोधन कसे केले पाहिजे व त्यासाठी आवश्यक असणारा वैचारिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा, याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले .
स्वेरी ही शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विविध बौद्धिक उपक्रमासाठी देखील नेहमी प्रोत्साहन देत असते. यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्रा. डॉ बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख कार्यरत असतात. ए.आय.सी.टी.ई. आणि ‘स्वेरीज् सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या ऑनलाइन कार्यशाळेत देशभरातील जवळपास ६० संस्थांमधील १०० हून अधिक शिक्षक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उद्योजक प्रशिक्षक दीपक मेनन म्हणाले की, ‘या कार्यशाळेच्या माध्यमातून प्राध्यापक वर्ग त्यांच्या महाविद्यालयात सामाजिक उद्योजकता तयार करण्यासाठी सुसज्ज व्हावेत. तसेच ते नेहमीच विद्यार्थ्यांना सामाजिक उद्योजक बनण्यासाठी उद्युक्त करतील.’ यावेळी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आणि स्पोकन ट्यूटोरियलचे संस्थापक प्रा.कन्नन मौदगल्य यांनी ट्यूटोरियल्सच्या माध्यमातून वंचित समाजातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (एनआयटीआयई) च्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप मार्गदर्शक डॉ. प्रसाद तिगलपल्ली (डॉ. मंडी) यांनी ‘बेच बेच के सीखो’ या विषयावर आपला अनोखा अनुभव सादर करताना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक नफा-आधारित स्टार्टअपचे सादरीकरण केले. सर्वया सोल्यूशन्सचे संस्थापक आणि आयआयटी मुंबईचे सहयोगी प्रा.विशाल सरदेशपांडे यांनी उद्योजकतेसाठी आवश्यक असणारी विचार प्रणाली आत्मसात करण्याबाबत सांगितले. स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले की, ‘उद्योजकतेची ताकद माझ्यासमोर तेव्हा स्पष्ट झाली, जेव्हा एका ग्राहकाने एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या तुलनेत माझ्या स्टार्टअपला प्राधान्य दिले- जी ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी देते.’ दुसऱ्या सत्रात सोबस इनसाइट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी यांनी उद्योजकतेबद्दल सांगताना म्हणाले की, ‘ प्रेक्षकांना उद्योजकतेबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी उद्योजक होणार नाही हे खरे असताना आपण तरुणांमध्ये उद्योजकतेचा पाया भरणी करताना जीवन कौशल्य निश्चितपणे निर्माण करू शकतो. तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण योग्य वातावरण तयार करू शकतो.’ व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडियाचे संचालक इंद्रजित चटर्जी यांनी स्मार्ट व्हिलेज प्रोजेक्ट सारख्या संकल्पने विषयी ओळख करून दिली. योग सत्रात आंतरराष्ट्रीय योग आघाडीच्या आरवायटी-५०० योगा प्रशिक्षक रेश्या पटेल व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक आकांक्षा सिन्हा यांनी यावेळी दररोज योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन केले होते. कार्यक्रम समन्वयक शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार म्हणाले की, ‘आम्ही सोबस इनसाईट फोरम बरोबर सामंजस्य करार केला आहे आणि स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे पंढरपुरात नवकल्पना चालविण्यास, कौशल्य प्रशिक्षण देण्यास आणि आर्थिक प्रगती करण्यास वचनबद्ध आहोत.’ कार्यशाळेच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी सहभागी लोकांसाठी प्रश्न मंजुषा, तसेच त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. ही कार्यशाळा विनाशुल्क आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उदघाटन स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व सोबस इनसाइट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रासह ओरिसा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पंजाब या राज्यांसाह भारतातून एकूण जवळपास २०० जणांनी सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रा.चेतन लिमकर, प्रा.श्रीकृष्ण गोसावी, सोबसचे गिरीश संपत यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.