इसबावी येथील” माता रमाई बुद्ध विहार” लोकार्पण सोहळा व भगवान तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

.जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- विश्र्वशांती नगर इसबावी येथील” माता रमाई बुद्ध विहार” लोकार्पण सोहळा व भगवान तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. विहाराचे उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शूभ हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. दोन्ही आमदारांनी कार्यक्रमाचे नियोजन करणारे समाधान लोखंडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी समाजबांधवांची मागणी होती बुद्ध विहार मध्ये वाचनालय सुरू करावे. यावेळी आमदार समाधान दादा आवताडेनी जागेवर वाचनालया साठी जी मदत असेल ती करण्याची ग्वाही दिली. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या एम. पी .एस सी. व यु. पी .एस. सी. च्या अभ्यासासाठी जे काही साहित्य लागेल ते सर्व मी मदत करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सुरुवातीस त्रीशरण,पंचशील सामुदायिक वंदना घेण्यात आली हा विधीवत कार्यक्रम विलास जगधने सर यांनी घेतला. सुत्रसंचलन प्रा.लक्ष्मण दंडाडे यानी केले.
यावेळी इसबावी माजी नगरसेवक गणेश भाऊ आधटराव, नगरसेवक विशाल मलपे, नगरसेवक सचिन शिंदे, समाधानदादा प्रतिष्ठानचे संस्थापक भैय्या साहेब कळसे, मा. नगरसेवक सनी मुजावर,मुन्ना मलपे,रुपेश अंबुरे,वस्ताद औदुंबर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्णा चंदनशिवे, बाळु लोखंडे, दिलीप जाधव,पिंटू लोखंडे, अनिल लोखंडे, सचिन लोखंडे,गोपाळ लोखंडे आदिनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य उपासक,उपासिका व ग्रामस्थ उपस्थीत होते.


