‘ लसाकम ‘ आणि ‘ ससम’ च्या वतीने लातूरात परडी व कवड्यांच्या माळांची होळी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
लातूर — येथील क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ (लसाकम ) आणि सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमीत्ताने नवरात्र महोत्सवात देवीच्या आराधनेसाठी वापरण्यात येणाऱ्या परड्या आणि कवड्यांच्या माळांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी जाहिरपणे होळी करण्यात आली. या होळीनंतर आंदोलनकर्त्यI कार्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून अंध्दश्रध्देला मूठमाती देत असल्याचे जाहिर केले.
यावेळी झालेल्या जाहिर सभेत अध्यक्षीय भाषण करताना ‘ लसाकम ‘ चे नियंत्रक नरसिंग घोडके म्हणाले की,14 अक्टोबर 1956 रोजी विजयादशमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने लाखो लोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. यावेळी डॉ.आंबेडकरांनी भारतातील बहुजनांना धर्मांतर करून जातीच्या जोखडातून मुक्त होण्याचे आवाहन केले होते. परंतु अजूनही बहुजन समाजातील अनेक जाती रुढीपरंपरेच्या जाळ्यात अडकल्या आहेत . त्यांच्या मुक्तीसाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज परड्या आणि कवड्यांच्या माळांचे दहन केले असल्याचे सांगीतले तर सत्यशोधक समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डी.एस. नरसिंगे यांनी ज्या समाजबांधवांनी अंध्दश्रधेला मूठमाती देऊन 14 अक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले त्या लोकांची प्रगती नेत्रदिपक असून त्यांचा आदर्श घेऊन बहुजन समाजाने वाटचाल करावी असे अवाहन केले. यावेळी ‘ लसाकम ‘ चे महासचिव राजकुमार नामवाड, जिल्हासचिव मधुकर दुवे आणि सत्यशोधक महिला आघाडीच्या प्रमुख मंगलताई कांबळे यांचीही समायोचित भाषणे झाली.
या आंदोलनात कास्ट्राईब संघटनेचे यु.डी. गायकवाड, सुभाष मस्के, राहूल गायकवाड, संजय राऊत ‘लसाकम ‘ चे शिरीष दिवेकर, राजेंद्र हजारे, संजय सुर्यवंशी, राजेश तोगरे, शिवाजी अवघडे ‘ ससम ‘ चे माणिकराव वाघमारे, बापू नरसिंगे, छगन घोडके, जी.ए. गायकवाड, सावळाराम कासारे , मुक्ता साळवे महिला परिषदेच्या श्रीमती अनुसया हजारे, अन्नपूर्णा नामवाड, अश्वीनी कांबळे, लक्ष्मी घोडके, सुनिता कांबळे,रंजीता शिंदे, निर्मला सुर्यवंशी, दुवेताई, गायककवाडताई, आशाताई नरसिंगे आदी प्रमुख कार्यकर्त्यIसह विद्यार्थी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.