बहुजन समाजातील ज्ञानवंतांची व गुणवंतांची कदर करून पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांना प्रोत्साहन देणे हाच आमचा हेतू.-.यू.टी. जाधव
आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे विविध कार्यक्रमांचे आयोजन...

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली जि. (आटपाडी- डाँ. रामदास नाईकनवरे)- दि. १७. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा आटपाडी च्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याचे नेते विश्वनाथ (आण्णा) मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वरूपामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये भव्य शिक्षक मेळावा, विविध क्षेत्रामध्ये ज्ञानदान करणार्या महिला शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व शिक्षकांनाही क्रांतीसुर्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ, ज्ञानाच्या विविध क्षेत्रात गुण कौशल्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, आदर्श माता पिता पुरस्कार वितरण सोहळा, सहाय्यक कलारत्न पुरस्कार वितरण सोहळा, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल, आयटीआय स्कूल यामध्ये प्रवेश मिळविला आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सन्मान सोहळा, आणि सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार ई. इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आटपाडी तालुका अध्यक्ष . संजय कबीर व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते मार्गदर्शक यू.टी.जाधव सर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
सदर कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषद समाज कल्याण चे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, जिल्हा परिषद सदस्या वंदना गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन, . यु .टी. जाधव, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन राजाराम सावंत, आटपाडी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. भूमिकाताई बेरगळ, सभापती पुष्पाताई सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी उपसभापती तानाजी यमगर, माजी उपसभापती रुपेश कुमार पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसन पाटील, पार्लमेंटरी बोर्ड सचिव श्री. शशिकांत भागवत, आटपाडी पंचायत समिती सदस्या सौ. सारिका भिसे व सौ. उषाताई कुटे, आटपाडी पंचायत समिती गट विकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी . अशोक म्हेत्रे, शिक्षक समितीचे कार्यकारी अध्यक्ष . वैभव शिंदे, शिक्षक समितीचे राज्य नेते . किरण गायकवाड, शिक्षक समितीचे राज्य संघटक सयाजीराव पाटील शिक्षक समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासो लाड, आणि शिक्षक समितीचे सरचिटणीस दयानंद मोरे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
सदरचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १९ आक्टोंबर२१ रोजी सकाळी साडेदहा वाजता आटपाडी येथील साळुंखे मल्टीपर्पज हॉल रोड येथे होणार असून तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक समिती आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष संजय कबीर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या पत्रकार परिषदेस यू.टी. जाधव सर ,आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष श्याम ऐवळे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असणारे हैबतराव पावणे, तालुका शिक्षक नेते रमेश हेगडे , माजी सरचिटणीस प्रवीण बाड, तालुकाध्यक्ष संजय कबीर, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले रुग्णालय सांगली चे संचालक, श्रीकांत कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.