Uncategorized

खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात युवक कॉंग्रेसच्यावतीने १०१ वृक्षांचे मोफत वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

 

पंढरपूर-अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप यांच्या आदेशाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले (मोलाणे) यांच्यावतीने पंढरपूर येथे गरजू शेतकऱ्यांना आंबा या फळाची 101 झाडे वाटप करण्यात आले व खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा प्रभारी गणेश जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, सुनंजय पवार, विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर, शहराध्यक्ष राजेश भादुले, सुमित शिंदे, देवानंद इरकल यांच्यासह आदि उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close