पंढरपूरात शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पंढरपुर:-शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन पंढरपुरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पंढरपूर शहर तालुका शिवसेना युवासेना व शिवसेना प्रणित विविध विभागाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील योग भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.तर नगरपालिका आरोग्य कर्मचारी संतोष साळवे आणि धर्मा पाटोळे यांचाही प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले.तर छत्रपती शिवाजी चौक येथे भाविकांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरविंद गिराम,डॉ. पारस राका,डॉ.सुधीर शिणगारे यांचे सह विविध प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयकप्रा.शिवाजीराव सावंत सर,माजी जिल्हा प्रमुख साईंनाथ भाऊ अभंगराव,शिवसेना पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख
संभाजीराजे शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,शिवसेना तालुका प्रमुखमहावीर देशमुख,शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे,शिवसेना पंढरपुर -मंगळवेढा समन्वयक संजय घोडके,शिवसेना पंढरपुर शहर समन्वयक
माऊली अष्टेकर,ग्राहक सं. कक्ष सोलापुर जिल्हा प्रमुख
जयवंत ( आण्णा ) माने,ग्राहक सं. कक्ष सोलापुर जिल्हा उपप्रमुख सिद्धनाथ कोरे,ग्राहक सं. कक्ष पंढरपुर शहर प्रमुख
काकासाहेब बुराडे,शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, सचिन बंदपट्टे ,विनय वनारे, पोपट सावतराव,बाबा अभंगराव, तानाजी मोरे,शिवसेना पंढरपुर शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे,शिवसेना पंढरपुर शहर संघटक गणेश घोडके,शिवसेना शहर प्रसिद्धी प्रमुख अमित ( पिंटू ) गायकवाड,शिवसेना विभाग प्रमुख पंकज डांगे-कोळी
वैभव बडवे, सूरज गायकवाड,अरुण कांबळे,गणेश वाघमारे,ईश्वर साळूंखे,शाखा प्रमुख प्रणित पवार यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.