.श्रावणी पाटील राष्ट्रीय “सुवर्ण बाण” पुरस्काराने सन्मानित
राज्य स्काऊड गाईड प्रशिक्षण केंद्राचा पुरस्कार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली. (जोशाबा टाइम्स वृत्त) दि. २०
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा आटपाडी येथे शिक्षण घेत असलेल्या श्रावणी विजयकुमार पाटील हिस नुकताच राष्ट्रीय “सुवर्णबाण” पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा येथे इयत्ता चौथीच्या वर्गात श्रावणी पाटील शिकत असून, ही स्पर्धा राज्य स्काऊड गाईड प्रशिक्षण केंद्रातर्फे सोनतळी जि. कोल्हापूर या ठिकाणी पार पडली होती. या स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधील आटपाडी तालुक्यातील पांढरेवाडी, गळवेवाडी ,तडवळे, युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल आटपाडी इत्यादी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सुवर्णबाण पुरस्कारासाठी अभ्यासक्रम हा पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी असतो. यामध्ये प्रवेश प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण, चतुर्थ चरण, आणि सुवर्णबाण असे अभ्यासक्रमाचे टप्पे असतात. या मधील चतुर्थ चरण ही तीन दिवसीय चाचणी परीक्षा ही स्काऊडचे राज्य प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे निवासी स्वरूपात घेतली जाते. यामधून विद्यार्थ्यांच्या मनामथ्ये शिस्त, नम्रता, स्वच्छता, देशभक्ती, व एकमेकांना मदत करणे या गुणांचे संवर्धन केले जाते.
या स्पर्धेसाठी श्रावणी पाटील हिस स्काऊ गाईड चिटणीस श्री. शांतिनाथ चंदनशिवे, जिल्हा स्काऊड गाईड संघटक श्रीमती. सविता भोये, पंचायत समिती आटपाडी चे गटशिक्षणाधिकारी श्री दत्तात्रय मोरे, केंद्रप्रमुख श्रीमती मैना गायकवाड, तालुका स्काऊड संघटक श्री हैबतराव पावणे, श्रीमती ललिता लवटे, जि. प. प्राथमिक शाळा प्रकाश वाडी, शाळा नंबर दोन.चे मुख्याध्यापक श्री आत्माराम गळवे, जि. प. प्रा शाळा रानमळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शहाजी पाटील मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा भोसले, सहशिक्षक श्री सुभाष शिंदे ई.चे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे
.


