शिक्षक बँक विरोधकांची अवस्था, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगासारखी..
मााजी अध्यक्ष व विद्यमान संचालक यु .टी. जाधव यांचा विरोधकावर हल्लाबोल...

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली. (जोशाबा टाइम्स वृत्त)
सांगली. (जोशाबा टाइम्स वृत्त)
दि. २०. सध्या जगभर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे हे सर्वज्ञात आहे. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्व कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावत आहेत. कोणत्याही शाखेत कर्जदार सभासदाची हेळसांड अथवा गैरसोय नसतानाही विरोधक मात्र सभासदांचा पोकळ कैवार घेण्यात मग्न आहेत. विरोधकांनी नेहमीच इतर बँकांचे गुणगान गायचे, त्यांच्या दारात शिष्टमंडळे धडकवायची, आमच्या बँकेपेक्षा तुमच्या बँका कशा नेटनेटक्या आहेत असे नगारे वाजवायचे व फक्त सत्तेच्या लालसेपोटी शिक्षक बँकेची काळजी आहे असे दाखवायचे हे पुतणा मावशीचे प्रेम सुज्ञ सभासद जाणतात.असा हल्ला शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक यु.टी.जाधव यांनी विरोधकावर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटलेे आहे की, त्यामुळे सत्तेसाठी उतावीळ झालेल्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी काटकसरीचा कारभार करून टप्प्याटप्प्याने कमी केलेले क़र्जाचे व्याजदर, कमी केलेली स्टँप ड्युटी, परत दिलेल्या मासिक कायम ठेवी, दरवर्षी डिव्हिडंट वाटपाचा चढता आलेख सोसवत नसल्याने, विरोधकांना त्यांच्या इतिहासात एकदाही कर्ज व्याजदरात कपात न करता आलेले अपयश लपविण्यासाठी सवंग लोकप्रियतेसाठीची केविलवाणी धडपड सुज्ञ सभासद उधळुन लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.विरोधक म्हणजे बँक लुटारूंची टोळी आहे याची खात्री सर्व सभासदांना असल्याने त्यांचे सत्तेचे स्वप्न दिवास्वप्नच राहणार यात तिळमात्र शंका नाही.गतवर्षी पासून कोवीडचे कर्ज10% ने सुरू आहे. शिवाय स्टँप मुळे कोणाचीही अडवणूक केलेले नाही .त्यामुळे विरोधकांनी खोटा कळवळा थांबवावा. उलट त्यांच्या काळात कर्जदार सभासदांना रीतसर स्टॅप ड्युटी भरूनसुद्धा चार ते पाच टप्प्यात कर्जवाटप होत होते हे ते सोयीस्कर विसरलेले दिसतात. तुमचे सभासदांपोटीचे बेगडी प्रेम सर्वजण ओळखुन आहेत.
आमचे मार्गदर्शक विश्वनाथ अण्णा मिरजकर ,राज्य नेते किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, पार्लमेंटरी अध्यक्ष किसनराव पाटील ,पार्लमेंटरी सचिव शशिकांत भागवत , चेअरमन सुनिल गुरव, व्हा. चेअरमन महादेव माळी आदींच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळाचे सर्व संचालक काम करीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आपल्या शिक्षक बँकेची बदनामी करण्यापेक्षा घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे स्वागत करावे व चांगले केलेल्यांना चांगले म्हणण्याची थोडीतरी दानत ठेवावी.असेही शेवटी म्हटलेे आहे.