Uncategorized

‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे आज, शुक्रवारी उदघाटन

कोरोना रुग्णाची होणार सोय

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॅम्पसमधील मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मध्ये स्वेरी या संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे आज शुक्रवार, दि. २१ रोजी दुपारी ०१.३० वाजता माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन होणार असून या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे तथा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे राहणार आहेत.
यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तर माण विधानसभा मतदार संघाचे सदस्य आमदार जयकुमार गोरे व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नूतन आमदार समाधान आवताडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार, गोपाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मस्के यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, समन्वयक डॉ. सोमनाथ शिंदे हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कोविड च्या पार्श्वभूमीवर वरील मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडणार असल्याचेही यावेळी ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ च्या वतीने कळविण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close