विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पुरुषांना आदर्श ठेवून आपले जीवन यशस्वी करावे- यशवंत गोसावी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर:-आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी थोर राष्ट्र पुरुषांचा आदर्श घेऊन आपली गुणवत्तेची जोपासणुक करावी व समाज हिताचेही भान ठेवावे व आपले नाव उज्वल करावे असे मत शिवनिश्चल ट्रस्ट पुणे चे संस्थापक यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले.ते श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरचे विभागीय पोलीस पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहायक निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे सर यांनी केले
प्रशालेत वर्षभरात राबवलेले विविध उपक्रम व गुणवत्तेविषयीचा वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य श्री राजेंद्र पाराध्ये सर यांनी केले. प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन करून पाहुण्यांचे स्वागत केले .त्यांना श्री सोमनाथ फडतरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेत स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना रोख व वस्तू पारितोषिक देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर , सचिव ॲड.वैभव टोमके, खजिनदार सलीम वडगावकर,संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल , हे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे,
पर्यवेक्षक सुनील पाटील ,किमान कौशल्य विभाग प्रमुख संजय पवार ,तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे, प्रसिद्धी प्रमुख राजूभाई मुलाणी,
शिक्षक प्रतिनिधी सुनील विश्वासे,पाटील व्ही.आर, सविता उपलप , क्रीडा शिक्षक महादेव रणदिवे, राहुल दळवी ,मुख्य लिपिक हनुमंत मोरे सर, डॉ. धायतडक, डॉ.देशपांडे,
हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तेश्वर मुळे,मोहिनी जरे यांनी केले तर आभार मधुकर भोसले यांनी मानले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी मुक्ता जोगदंड हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी प्रशाला व कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.