लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुभाऊ कसबे यांच्या प्रमुख उपस्थित नियुक्ती पत्र प्रदान

विष्णू भाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना नियुक्ती पत्र प्रदान करताना -समवेत मा कैलास भाऊ खंडारे प्रदेश कोर कमिटी मेंबर नियुक्तीपत्र स्वीकारताना देविदास कसबे.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
पंढरपूर प्रतिनिधी):-पंढरपूर (शेठ जाधवजी जेठाभाई ट्रस्ट) स्टेशन रोड येथे लहुजी शक्ती सेनेची राज्य स्तरीय बैठक दिनांक २३/०१/२०२३ सोमवारी पार पडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु भाऊ कसबे यांच्या सह राज्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडीमध्ये पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी देविदास कसबे (पंढरपूर), राज्य कार्यकारणी सदस्य संजय कदम (करमाळा), सोलापूर जिल्हा उपप्रमुख जयसिंग मस्के (पंढरपूर), लहूजी जिल्हा कामगार युनियन प्रमुख पदी शशी कसबे (मोहोळ), सोलापूर जिल्हा प्रमुख वसंत देडे (अक्कलकोट), सोलापूर जिल्हा युवक प्रमुख संजय फाळके (सांगोला), सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख बाबा जगताप (टेंभूर्णी), सांगोला तालुका महिला आघाडी प्रमुख – सौ. मायाताई लोंढे (सांगोला), पंढरपूर तालुका प्रमुख पदी मुकुंद घाडगे (नारायण चिंचोली), पंढरपूर तालुका उपप्रमुख पदी – समाधान वायदंडे (देगांव), पंढरपूर तालुका संघटक पदी गणेश लोंढे (सरकोली), पंढरपूर तालुका सरचिटणीस पदी बापू घाडगे (नारायण चिंचोली), पंढरपूर तालुका उपप्रमुख आप्पा वाघमारे (तुंगत) इत्यादींच्या निवडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णु भाऊ कसबे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
. संस्थापक अध्यक्ष मा विष्णू भाऊ कसबे यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना मा जयसिंग मस्के समवेत कोर कमिटी मेंबर कैलास भाऊ खंडारे,मा महादेव भोसले, मुकुंद घाडगे .
या वेळी कोअर कमिटी प्रदेश प्रमुख कैलास भाऊ खंडारे (बुलढाणा), युवक प्रदेश प्रमुख सचिन भाऊ शिरसट, सोशल मिडीया महाराष्ट्र प्रमुख नितीन दोडके (पुणे), पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव भोसले (सोलापूर), राज्य कार्यकारणी सदस्य रोहित खलसे (येरमाळा), राज्य कार्यकारणी सदस्य – सागर लोखंडे ( अकलुज), राज्य कार्यकारणी सदस्य- रजनिश डोलारे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राम कांबळे (मोहोळ) सोलापूर शहर प्रमुख योगेश सोनावणे, मोहोळ तालुका प्रमुख सोमनाथ कसबे (बेगमपूर), राज्य कार्यकारणी सदस्य सुदर्शन मसुरे, सांगोला तालुका प्रमुख आप्पा वाघमारे, मंगळवेढा तालुका प्रमुख राहुल मस्के, मार्गदर्शक अशोक पाटोळे, मार्गदर्शक सत्यवान देवकुळे, नारायण गायकवाड, कुमार गायकवाड, सुभाष कांबळे, सदाशिव कसबे, विनोद अवघडे सर, प्रदीप रणदिवे, महेश घाडगे, बालाजी शिंदे, महेश पाटोळे, राजु सकट, गणेश वाघमारे, मल्हारी फाळके, पप्पू वाघमारे, दयानंद खिलारे, सचिन जगताप, दुर्योधन लोखंडे, रवि वायदंडे, जगदिश खिलारे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बार्शी येथील फटाका कारखान्यातील दुर्घटनेच्या विषयावरती व आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावरती येत्या 10 दिवसामध्ये सोलापूरजिल्हयातील प्रतत्येक तालुका कचेरीवर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष मा.विष्णु भाऊ कसबे यांनी सांगितले.