पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिनचे गावात आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी जिल्हा समन्वयक रोहित खोलखुंडे, राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे,गणेश घाटगे, दौलत घाटगे, शिवाजी घाटगे, जनार्दन घाटगे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मिणचे:-[ ता.हातकणंगले ] पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मिनचे गावातील नागरिकांचे साठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.महात्मा फुले जन आरोग्य योजना आणी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कोल्हापूरचे समन्वयक रोहित खोलखुंबे यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मिनचे ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी प्रमुख उपस्थितीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे, पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष गणेश घाटगे, हातकणंगले तालुका अध्यक्ष रवी हंकारे, दौलत घाटगे, जनार्दन घाटगे, शिवाजी घाटगे महाराज इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमित्र श्री सचिन भोसले सर श्री सुनील शेताळे सर श्री लक्ष्मण कोठारे सर यांनी या आरोग्य तपासणी शिबिरास मदत केली.


