Uncategorized

दिलीप धोत्रे व नागेश भोसले यांच्या पुढाकाराने १५०बेडचे कोरोना रुग्णालय झाले सुरु

ना नफा ना तोटा तत्वावर सुरु केला उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर:-कोरोनाचा वाढता धोका बघता अनेक ठिकाणी हाँस्पिटल ची कमतरता जाणवत आहे.अनेक संस्था ,संघटना ,व्यक्ती एकत्र येऊन आँक्सिजन युक्त बेडसहित सुसज्ज हाँस्पिटल उभा करित आहेत.पंढरपूरातील चिंताजनक परस्थिती बघुन मनसेचे प्रदेश संघटक दिलीप धोत्रे व माजी उपनगराध्यक्ष व पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने १५०बेडचे पल्स कोविड हाँस्पिटल भटुंबरे(पंढरपूर) येथे उभे करण्याचा निर्णय घेतला व अल्पावधीतच सर्व प्रक्रिया करुन आज उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदी व पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. हाँस्पिटल मध्ये ५०आँक्सिजन बेडची सोय असुन इतर १००बेड आहेत. येथे दाखल होणाऱ्या रुग्णास दोन वेळचे जेवण, नाष्टा,आणि आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे पत्रकारासाठी काही बेड राखीव ठेवले असुन त्यांचेवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.” ना नफा ना तोटा” या तत्वावर हे हाँस्पिटल सुरु केले असुन गरजुनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप धोत्रे व नागेश भोसले यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close