Uncategorized

कोविड लस सर्वांना मिळावी यासाठी सिईओ दिलीप स्वामी यांनी केले विशेष नियोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर:-१मे २०२१ पासून भारत सरकारने १८ ते ४४वयोगटातील लाभार्थ्यांचा लसीकरणा मध्ये समावेश केलेला आहे. लाभार्थ्यांची वाढलेली संख्या व होणारा लस पुरवठा यामधील तफावतीच्या पार्शश्वभूमीवर      मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वाामी याांनी परिपत्रक काढून लसीकरण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामुळे लसीकरणा मध्ये येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे.१)१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची cowin संकेत स्थळावर व आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर राहील. याकामी मुख्याध्यापक व शिक्षकांना ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक सहकार्य करतील व नोंदणीच्या कामातील आडी अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी मदत करतील.
२)लाभार्थी नोंदणीचे रजिस्टर ठेवून ते दैनंदिन अद्ययावत करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेवक यांची राहील.
३) लसीकरणासाठी वेळेची निश्चिती व time slot निवड करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामसेवक व नागरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांची राहील याकामी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदत करतील.
४) लसीकरणासाठी नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे.
अ) ६० वर्षे वयावरील नागरिक व दुसरा डोस देय असलेले (सहा आठवडे पूर्ण झालेले) नागरिक.
ब) ४५ वर्षे वयावरील अति जोखमीचे नागरिक व पंचेचाळीस वर्षे वयावरील नागरिक.
क) १८ ते ४४ वयोगटातील नागरिक.
५) लसीकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत प्राधान्यक्रमानुसार दैनंदिन लाभार्थ्यांना स्लीप दिली जाईल व स्लीप नुसारच प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाईल. विना स्लीप कोणालाही लसीकरण करण्यात येणार नाही. स्लीप शिवाय लसीकरण न करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील. त्याचप्रमाणे प्रा.आ केंद्र क्षेत्राबाहेरील नागरिकांना लस दिली जाणार नाही.
६) तालुका आरोग्य अधिकारी हे नागरी भागात वार्ड निहाय व ग्रामीण भागात गाव निहाय लोकसंख्येच्या आधारावर लस वाटप करतील.
7) लसीकरण सत्राच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील.
८) cowin संकेतस्थळावर व आरोग्य सेतू ॲप वर लाभार्थी नोंदणीचा दैनंदिन आढावा गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे घेतील.
तरी नागरिकांनी वरील सुविधेचा लाभ घेऊन दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आपणास ठरवून दिलेल्या वेळेतच लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close