Uncategorized
अरिहंत पब्लिक स्कुल चे 50व्या वर्षात पदार्पण
वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन --डॉ. शीतल शहा


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर ( प्रतिनिधी) आज माॅडर्न एज्युकेशन सोसायटीचे अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर या शैक्षणिक संस्थाची पन्नास वर्षांकडे वाटचाल सुरू झाली असून त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. शीतल शहा यांनी दिली. या कार्यक्रमाची सुरुवात आज 25आक्टोबर रोजी अरिहंतच्या प्रांगणात झाली. यावेळी जयंत बोधले महाराज व पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांचे हस्ते दीप प्रज्वलन व लोगोचे उदघाट्न झाले त्या प्रसंगी बोलत होते.

डॉ.शीतल शहा पुढे म्हणाले की काही वर्षांपूर्वी कोरोना ही महामारी संपूर्ण जगभर पसरली होती.या दोन वर्षांच्या काळामधील शैक्षणिक फी ही ५०/टक्के रक्कम ही माफ केली आहे.गरीब हुशार गरजू विद्यार्थ्यांना मदत ही कायमस्वरूपी केली जाते.या अरिहंत पब्लिक स्कूल ला पंढरपूर मधील सर्व पालकांनी नेहमी प्रोत्साहन दिले आहे.या पालकांच्या मुळे आम्ही या संस्थेला प्रगती पथावर नेत आहोत.असे संस्थेचे अध्यक्ष डॉ शीतल शहा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे जयंत बोधले महाराज म्हणाले कीं या प्रशाले तून आय. ए. एस., आय. पी. एस. विद्यार्थी निर्माण होतीलच पण चांगला माणूस विद्यार्थी घडला पाहिजे याकडे अध्यापकाने लक्ष दिले पाहिजे. संस्कार देणारी शाळा म्हणुन अरिहंतचा लौकिक आहे. तो टिकला पाहिजे.

स्काउट पथकाचे बँड संचालन व विध्यार्थ्यानी गायलेले स्वागत गीत व विद्यार्थिनीनी केलेले सूत्रसंचालन लक्षणीय होते. तसेच विदयार्थी विध्यार्थिनींनी वैज्ञानिक, चित्रकला, रांगोळी यांचे कल्पक प्रदर्शन लक्षवेदी होते.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉ.सुनील पटवा , वैशाली दोशी,प्रतिभा दोशी, मिलिंद शहा, पत्रकार वीरेंद्र उत्पात, माजी नगरसेविका कमलताई तोंडे , प्रणितीताई भालके आदी मान्यवर उपस्थित होते.



