Uncategorized

आंबे येथील विहीर दुर्घटनास्थळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट

बचावकार्याचा घेतला आढावा; संबंधित यंत्रणांना दिल्या आवश्यक सूचना

बचाव कार्यासाठी रात्री ०८.१५ वाजता एन डी आर एफ पथक दाखल. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लारवार उपस्थित बचावकार्याचा घेतला आढावा; संबंधित यंत्रणांना दिल्या आवश्यक सूचना

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

पंढरपूर, (दि. १५) :- पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून चार कामगार अडकल्याच्या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

विहीर मालक दत्तात्रय निवृत्ती शिंदे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू असताना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये मंगेश मोरे (वय ३५), सिद्धेश्वर घाडगे (वय ४५), आबासाहेब घोडके (वय ५०) आणि तानाजी घोडके (वय ५४) हे चार कामगार मातीखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रशासनाचे लक्ष असून, बचावकार्याला आवश्यक ती गती देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दगड मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नातेवाईकांशी संवाद साधून धीर दिला.

यावेळी त्यांच्यासमवेत अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

हे बचाव कार्य पंढरपूर नगरपालिका अग्निशामक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, तालुका प्रशासन यांच्यामार्फत सुरू असून, बचाव कार्य साठी एनडीआरएफचे पथक देखील येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close