दुष्काळी परिस्थितीचे भान, गाईंना चारा देवून साजरा केला वाढदिवस अरुण कोळी यांच्या उपक्रमाचे कौतुक


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर,:सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या पशु अन् बळीराजाला माणुसकीच्या दृष्टिकोनातून दिलासा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आपला वाढदिवस रद्द करुन वाढदिवसासाठी होणारा खर्च गाईंच्या चाऱ्यासाठी देऊ केला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा अपुरा पाऊस झाल्याने, चारा आणि पाण्याची अवस्था बिकट झाली आहे.
बार्डी येथील शासकीय वनावरील वन गाईंची दुष्काळामुळे उपासमार होत असते.
ज्या मुक्या जनावरांना पालक आहेत त्यांना वेळेवर चारा पाणी मिळू शकतो. मात्र वनात भटकणाऱ्या जनावरांची उपासमार होत असते.
या मुक्या जनावरांचे हाल लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत वाढदिवसाला होणारा खर्च बार्डी येथील वन गाईंना चारा उपलब्ध करुन साजरा केला.
यावेळी वैभव उर्फ सोनु कोळी, अथर्व गायकवाड, निरज परचडे, अमोल माने, प्रसाद कोळी, सचिन नेहतराव आदी उपस्थित होते.




