Uncategorized

प्रभाग क्रमांक १७ मधील बडवेचर झोपडपट्टीतील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीचे औचित्य साधून मनसे नेते दिलीप धोत्रे, नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर :-शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील बडवेचर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची रस्त्याची समस्या आता मार्गी लागणार आहे. या परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्य सौ. माधुरी दिलीप धोत्रे आणि नगरसेवक लोकेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक नागेश यादव, श्रीमंत यादव, दुर्याधन यादव, दीपक नाईकनवरे, दिनेश पांढरे, भाऊसाहेब कांबळे, नाथा यादव, प्रसाद यादव, गौरव ओव्हाळ, निलेश माने, राजू देवकुळे, संतोष वाघमारे, नागेश खरात, अंबादास वायदंडे, दशरथ यादव यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रभाग क्रमांक १७ मधील बडवेचर झोपडपट्टी परिसरातील रस्त्यांची अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन परिसरातील सिमेंट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीट रस्ता तयार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी समस्या तसेच दैनंदिन ये-जा करताना होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकासकामाबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक १७ चा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला असून अल्पावधीतच प्रभागातील प्रलंबित विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांना दिलेली विकासाची आश्वासने प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने एकापाठोपाठ एक विकासकामांना सुरुवात होत आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास संपादन करण्यावर भर असल्याचे या कामातून दिसून येत आहे.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की, प्रभागातील प्रत्येक भागाचा समान आणि सर्वांगीण विकास व्हावा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. बडवेचर झोपडपट्टीतील नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळावी, ही अनेक दिवसांची अपेक्षा होती. पक्का रस्ता झाल्याने येथील नागरिकांचा दैनंदिन त्रास कमी होईल. प्रभागातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून नागरिकांना दिलेली वचने पूर्ण करणार आहोत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close