Uncategorized

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त KGN ग्रुपच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर संपन्न

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून KGN ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मानवतेचा, बंधुत्वाचा आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये अनेक युवकांनी रक्तदान केले तर अनुभवी डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचाराबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मोहम्मद पैगंबर जयंती मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष हाजी आबिद भाई बेळगावकर,युवा नेते प्रणव परिचारक,इमरान मनेरी,पत्रकार अभिराज उबाळे, इस्माईल बोहरी,आसिफ शेख इंजिनियर,आरोग्य अधिकारी डॉ. सलीम मुलाणी, रियाज तांबोळी, शफीभाई मुलाणी, समाजसेवक गणेश साळुंखे, मुसा तांबोळी, शकील मुल्ला, सद्दाम तांबोळी, फारुख मनेरी, यासीन तांबोळी आदी मान्यवर व KGN ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अशा उपक्रमातून समाजात एकतेचा संदेश जातो, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी KGN ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close